दि.१७ डिसेंबर रोजी जोशी हॉस्पिटलच्या नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन


दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण येथे गेल्या 22 वर्षांपासून अवितरपणे रुग्णसेवेसाठी कार्यरत असलेल्या डॉ. प्रसाद जोशी यांच्या जोशी हॉस्पिटल प्रा. लि; च्या नुतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवार, दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता लक्ष्मीनगर, फलटण येथे संपन्न होणार आहे. यावेळी स्वस्थीयोग प्रतिष्ठान, मिरजचे डॉ. जी. एस.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून हा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

कार्यक्रमास फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, प्रगतशील शेतकरी श्रीमंत बंटीराजे खर्डेकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, प.पू.उपळेकर महाराज देवस्थान समिती, फलटणच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती शारदादेवी कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रल्हादराव साळुंखे-पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिन सूर्यवंशी (बेडके), ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, प्रा.रमेश आढाव यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

फलटणचे प्रांताधिकारी डॉ.शिवाजी जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसिलदार समीर यादव, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.अमिता गावडे, फलटण शहर पोलीस निरीक्षक डी.एस.पवार, फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जोशी हॉस्पिटल प्रा.लि; चे प्रमुख डॉ.प्रसाद जोशी, श्रीमती जयश्री जोशी, डॉ.सौ.प्राची जोशी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!