तासाभराच्या पावसाने मंगळवार पेठेतील निळी तालीमची दुरावस्था; कंत्राटदारावर तीव्र नाराजी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १० जुन २०२२ । फलटण । शहरात काही तासांपुर्वी सुमारे एक तास पाऊस झाला. फक्त एक तासाच्या पावसाने एका महिन्यापुर्वी उद्घाटन करण्यात आलेली शहरातील मंगळवार पेठेतील निळी तालीम जिमची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. फक्त एक तासाच्या पावसानेच जिममध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे युवकांना जिम करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कंत्राटदाराने केलेल्या कामावर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. असे कामकाज करणार्या कंत्राटदारांना नगरपरिषदेने काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी दबक्या आवाजात युवक करित आहेत.

Back to top button
Don`t copy text!