
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील दुकाने व आस्थापना, हॉटेल, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज व इतर सर्व आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवू नये. तसेच बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे सहायक कामगार आयुक्त रे. मु. भिसले यांनी कळविले आहे.
बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमन 1986 अन्वये 14 वर्षाखालील बालकास धोकादायक व बिगर धोकादायक व्यवसाय, प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. तथापी 14 ते 18 वर्षे वयोगटातील बालकास बिगर धोकादायक व्यवसाय, पिक्रियेमध्ये नियमन करण्यात आले आहे. तथापि, धोकादायक व्यवसाय, प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे, असेही सहायक कामगार आयुक्त रे. मु. भिसले यांनी कळविले आहे.
