करंजखोप येथे फळबाग लागवडीच्या चौरस प्रणालीबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन


दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत फळबाग (आंबा) लागवडीसाठी वापरल्या जाणार्‍या चौरस प्रणालीची माहिती शेतकर्‍यांना दिली. यामध्ये फळझाडांमधील अचूक अंतर कसे घ्यावे, जेणेकरून उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, तसेच या चौरस प्रणालीद्वारे झाडांतर्गतची घनता कशाप्रकारे वाढवता येईल याबद्दलची माहिती शेतकर्‍यांना दिली.

कृषी महाविद्यालयाचे प्राचर्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडीत मॅडम व प्रा. संजय अडत सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत दुधाळ सौरभ, बेलदार शुभम, लोखंडे सुप्रीत, मिंडा शिवरूप, ढोबळे सुमित, दोडमेसे शुभम या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.


Back to top button
Don`t copy text!