दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२४ | मुंबई |
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारच्या द्वितीय (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात एकूण ८ हजार ६०९ कोटी १७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. यापैकी ५ हजार ६६५ कोटी ४८ लाख रुपयांच्या मागण्या अनिवार्य आहेत. २ हजार ९४३ कोटी ६९ लाख रुपयांच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत, तसेच १७ हजार रुपयांच्या मागण्या केंद्रपुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्यांमध्ये सादर केल्या आहेत.
सादर झालेल्या ८ हजार ६०९ कोटी १७ लाख रुपयांच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ६ हजार ५९१ कोटी ४५ लाख रुपयांचा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्यांमध्ये महत्वाच्या व मोठ्या पुरवणी मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :-
या पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या विभागाच्या पुरवणी मागण्या अंतर्भूत झालेल्या आहेत, ते विभाग पुढीलप्रमाणे :-
क्र. विभाग रक्कम (रुपये कोटीत)
१. वित्त विभाग १८७१.६३
२. महसूल व वन विभाग १७९८.५८
३. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग १३७७.४९
४. विधि व न्याय विभाग १३२८.८७
५. नगर विकास विभाग ११७६.४२
६. नियोजन विभाग ४७६.२७
७. गृह विभाग २७८.८४
८. कृषी व पदुम विभाग २०४.७६
९. सार्वजनिक बांधकाम विभाग ९५.४८