आधुनिक शेतीची माहिती थेट मोबाईलवर; कृषिदूत उपक्रमाचा फायदा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणमधील कृषिदूत विद्यार्थ्यांनी खुंटे येथे शेतकऱ्यांचा व्हाट्सअप गट सुरू करून आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती मोबाईलवर देण्याचा नवा उपक्रम राबवला.

स्थैर्य, फलटण, दि. 17 नोव्हेंबर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती सहज मिळावी, यासाठी कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषिदूत विद्यार्थ्यांनी खुंटे येथे शेतकऱ्यांचा व्हाट्सअप गट सुरू केला आहे. या गटाद्वारे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज, रोग व कीड नियंत्रण, बाजारभाव आणि शासकीय योजनांची माहिती मराठीत नियमित दिली जाणार आहे.

कृषी विद्यार्थ्यांचा 20 आठवड्यांचा मुक्काम

ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत फलटण कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आगामी 20 आठवडे खुंटे येथे राहणार आहेत. या पथकात आर्यन जगदाळे, यश जाधव, अभिषेक खोमणे, प्रथमेश डुकरे, अथर्व डुकरे आणि यश सोनवणे यांचा समावेश आहे.

संवाद, मार्गदर्शन आणि ग्रामस्थांची प्रतिक्रिया

गाव भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती, जल व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होऊन शेती विकासाला चालना मिळेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी प्राचार्य यू. डी. चव्हाण, प्राचार्य एस. डी. निंबाळकर, प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. जी. बी. अडसूळ, प्रा. एन. एस. धालपे आणि प्रा. एन. ए. पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!