
दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । सातारा । सातारा शहरातील शाहूनगरमध्ये बंद घर फोडून अज्ञाताने चोरी केली. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड नेण्यात आली. ही घटना दि. ३0 ते ३१ मे दरम्यान घडली. यामध्ये एकूण ७३ हजारांचा ऐवज चोरीस गेला असून सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूनगरमधील साई कॉलनीत चोरी झाली. बंद घराच्या मुख्य लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञाताने घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या ड्रावरमधून सोन्याची वेढणी, सोन्याचे बदाम, चांदीचे पैंजण आणि रोख ३० हजार असा ऐकूण ७३ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी विक्रांत मारुती फडतरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास हवालदार चव्हाण हे करीत आहेत.