
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत शेतमाल पॅकेजिंगची साधने व त्याचा वापर यावर माहिती देण्याचे प्रात्यक्षिक दिले.
कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी हे प्रात्यक्षिक दिले. याअंतर्गत त्यांनी शेतमाल वाहून नेण्यासाठी जे पॅकींग मटेरियल वापरतात जसे की पोते, कॅरेट यांची माहिती व वापर सविस्तर सांगितले. तसेच द्राक्षे, आंबा, सफरचंद इ. फळांची व्यवस्थितपणे ने-आण करण्यासाठी लाकडीपेटी, प्लास्टिक बॉक्स यांचीही माहिती व वापर शेतकर्यांना सांगितला.शेतकर्यांनी या प्रात्यक्षिकास मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. नगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
