दैनिक स्थैर्य | दि. २० मार्च २०२४ | फलटण |
‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणार्या, मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचलित जनसेवा डायग्नोस्टीक सेंटरचा शुक्रवार, दि. २९ मार्च २०२४ रोजी द्वितीय वर्धापनदिन आहे. या जनसेवेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून फलटण शहरातील घरकाम करणार्या महिला सेविकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.०० वाजेदरम्यान होणार आहे.
शिबिराला रक्त तपासणीला येण्यापूर्वी महिलांनी १२ तास अगोदर काहीही खाऊ नये. आदल्या दिवशी रात्री हलके जेवण करावे, चहा-कॉफी पिऊ नये, पाणी पिणे. जेवणापूर्वीची तपासणी वेळ सकाळी ७.३० ते १०.०० राहील.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शनाची वेळ दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.०० असेल.
शिबिराचा पत्ता :
जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर, दुसरा मजला, स्वरा हाईटस्, आर्यमान हॉटेलसमोर, रिंगरोड, फलटण.
शिबिराला नावनोंदणी आवश्यक असून नावनोंदणी दि. २७ मार्चच्या सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत करणे अनिवार्य आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क :