ऊस टंचाई असूनही श्री दत्त इंडियाचे उच्चांकी गाळप – अजितराव जगताप

८ लाख ६२ हजार मेट्रिक टन गाळप करून हंगामाची सांगता


दैनिक स्थैर्य | दि. २० मार्च २०२४ | फलटण |
गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षीच्या आव्हानात्मक हंगामामध्ये उसाची टंचाई असून सुद्धा श्री दत्त इंडिया कारखान्याने तालुक्यामध्ये व इतिहासात प्रथमच उच्चांकी गाळप केले असल्याचे कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी गळीत हंगाम सन २०२३-२४ च्या सांगता समारंभप्रसंगी केले.

यावेळी श्री दत्त इंडियाचे संचालक चेतन धारू, महंत शामसुंदर विधवांस महाराज, व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, प्रोडक्शन मॅनेजर भारत तावरे, दिगंबर माने, चीफ केमिस्ट नितीन नाईकनवरे, चीफ इंजिनिअर अजित कदम, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पोपटराव भोसले, खजिनदार गोरख भोसले, एच. आर. विराज जोशी, ऋतुराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, पै. संतोष भोसले, केन सुपरवायझर एस. के. भोसले, ट्रान्सपोर्ट इन्चार्ज नितीन भोसले, सुरक्षा अधिकारी अजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

अजितराव जगताप म्हणाले, गतवर्षी राज्यामध्ये झालेल्या अत्यल्प पावसामुळे उसाची कमतरता यावर्षी प्रकर्षाने जाणवणार हे निश्चित होते, मात्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कंपनीच्या कार्यकारी संचालिका प्रीती रूपरेल व संचालक जितेंद्र धारू यांनी तालुक्यासह परिसरातील शेतकर्‍यांना मागील चार गळीत हंगामामध्ये वेळेवर दिलेली ऊस बिले व अचूक वजन काटा यामुळे तालुक्यासह तालुक्याबाहेरील शेतकर्‍यांनी श्री दत्त इंडिया कारखान्यावर विश्वास दाखवल्याने तालुक्यात व इतिहासात प्रथमच कारखान्याचे ८ लाख ६२ हजार ९५२ मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय आम्ही पुरे करू शकलो. श्री दत्त इंडिया कारखान्यावर तालुका व तालुक्याबाहेरील शेतकर्‍यांनी विश्वास ठेवून ऊस घातला. त्यांचे तसेच ऊस वाहतूकदार, कंत्राटदार, कारखान्यातील सर्व विभागातील कर्मचारी यांचे आभार व अभिनंदन व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!