मुख्याध्यापकांसाठी मोठी खुशखबर; वर्षाला मिळणार १५ दिवसांची अर्जित रजा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्य सरकारने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, दीर्घ सुट्टीच्या काळात काम करण्याच्या मोबदल्यात दरवर्षी १५ दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०२ नोव्हेंबर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील दीर्घ सुट्टीच्या कालावधीत प्रशासकीय व इतर कामे पार पाडणाऱ्या पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांसाठी राज्य शासनाने सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार पात्र मुख्याध्यापकांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात १५ दिवसांची अर्जित रजा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा लाभ १ जानेवारी २०२३ पासून लागू केला जाणार असून, यामुळे हजारो मुख्याध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अटी व शर्ती लागू

या विशेष निर्णयांतर्गत शासनाने काही नियम व अटी निश्चित केल्या आहेत. दीर्घ सुट्टीच्या काळात मुख्याध्यापकांना विनाकारण शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती केली जाणार नाही. मात्र, सुट्टीच्या काळात शालेय कामकाज केल्यास हजेरी पत्रकावर सही करणे बंधनकारक राहील. तसेच सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापकांनी किमान ३० दिवस कार्यालयात उपस्थित राहून कामकाज पाहणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष उपस्थिती ३० दिवसांपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात रजा अनुज्ञेय ठरेल.

रोखीकरणास मात्र बंदी

शासनाच्या या निर्णयानुसार मुख्याध्यापकांना प्रतिवर्षी १५ दिवसांची अर्जित रजा मिळणार असली, तरी या रजेचे रोखीकरण करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुट्टीच्या काळात मुख्याध्यापक विनाकारण अनुपस्थित राहिल्यास त्यांना अर्जित रजेचा लाभ मिळणार नाही आणि महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!