स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदतर्फे 9 व 13 ऑगस्ट रोजी कार्यक्रमांचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत 9 व 13 ऑगस्ट 2022 रोजी   कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) मनोज जाधव यांनी दिली आहे.

दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रभात फेरी जिल्हा परिषद पासून पोवई नाका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक-जिल्हा परिषद अशी होणार आहे.

दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत कार्यालय व जिल्हा परिषद परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशिय सभागृह, सातारा येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील   अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!