शून्यची ‘आय नो फर्स्ट’सोबत भागीदारी


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२३ । मुंबई । शून्य बाय फिनवासिया हे अग्रगण्य झीरो-ब्रोकरेज ट्रेडिंग व्यासपीठ वैयक्तिक स्टॉक्ससाठी एआय-आधारित अंदाज व सिग्नल्स देणारे भारतातील पहिला ट्रेडिंग व्यासपीठ आहे. एआय-समर्थित शेअर बाजार अंदाज देण्यामध्ये विशेषीकृत असलेली अग्रगण्य आर्थिक तंत्रज्ञान कंपनी आय नो फर्स्ट (आयकेएफ) सोबत त्यांच्या विशेष सहयोगामुळे हा टप्पा शक्य झाला.

‘आय नो फर्स्ट’मधील अत्याधुनिक तंत्रज्ञान जवळपास १५०० भारतीय स्क्रिप्सच्या हालचालींचा अंदाज वर्तवते आणि शून्यच्या ग्राहकांसाठी दररोज सर्वोत्तम गुंतवणूक संधी ओळखते. हे अंदाज एआय व मशिन लर्निंगचा वापर करत व्यापक ऐतिहासिक डेटा संशोधनावर आधारित आहेत. हे नवीन टप्पे स्पर्धात्मक अग्रणी स्थान मिळवून देणाऱ्या दर्जात्मक वैशिष्ट्यांसह ग्राहकांना सक्षम करण्याच्या शून्यच्या समर्पिततेशी संलग्न आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ३०-दिवस फ्री ट्रायल कालावधी सादर केला आहे, ज्यानंतर ते प्रतिमहिना ९९९ रूपयांमध्ये उपलब्ध असेल.

‘आय नो फर्स्ट’चे पाठबळ असलेल्या शून्यच्या या नवीन वैशिष्ट्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) व मशिन लर्निंग (एमएल)ची क्षमता समाविष्ट आहे. तसेच यामध्ये आर्टिफिशयल न्यूरल नेटवर्क्स व जेनेटिक अल्गोरिदम्सच्या घटकांचा समावेश आहे, ज्या माध्यमातून ते आर्थिक बाजारपेठांचे विश्लेषण, मॉडेल व अंदाज करते. हे अंदाज ग्राहकांना योग्य ट्रेडिंग निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी विश्वसनीय डेटाच्या व्यापक विश्लेषणावर आधारित आहेत.

फिनवासियाचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. सर्वजीत विर्क म्हणाले, ‘‘आम्हाला आय नो फर्स्टसोबतच्या आमच्या विशेष सहयोगाच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेसाठी एआय-समर्थित अंदाजात्मक विश्लेषण प्रदान करण्याकरिता भारतातील पहिले ट्रेडिंग व्यासपीठ बनण्याचा आनंद होत आहे. हा शून्यसाठी लक्षणीय टप्पा आहे, जेथे आम्ही भारतातील ट्रेडिंग क्षेत्र पुन्हा एकदा पुनर्परिभाषित करण्यासोबत त्यामध्ये धुमाकूळ निर्माण करणे सुरू ठेवले आहे. व्यक्तिनिष्ठ माहितीवर अवलंबून असलेल्या पारंपारिक सल्लागार सेवांच्या तुलनेत आमचे एआय तंत्रज्ञान व्यापक डेटा-आधारित विश्लेषणाचा फायदा घेत अचूक अंदाज व बहुमूल्य बाजारपेठ माहिती देते. आम्ही उद्देशपूर्ण व विश्वसनीय माहितीच्या आधारावर योग्य निर्णय घेण्यास ग्राहकांना मदत करण्यासाठी भावी ट्रेडिंगच्या दिशेने मोठी झेप घेत आहोत.’’

या नवीन वैशिष्ट्यामध्ये अनेक फायदे असून यात भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम गुंतवणूक संधी ओळखणे, उद्देशपूर्ण दृष्टिकोन, कलर-कोडेड सिग्नल्स, प्रेडिक्टेबिलिटी इंडिकेटर, इंस्टण्ट हिटमॅप्स, एआय-समर्थित पोर्टफोलिओ मॉनिटरिंग, एआय-समर्थित स्टॉक मार्केट इंटेलिजन्स आदींचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!