
युवासेना महाराष्ट्र प्रदेश सचिव किरण साळी यांचे फलटण शहरातील नाना पाटील चौकात राजे ग्रुप आणि शिवसेनेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. २९ जून : युवासेना महाराष्ट्र प्रदेश सचिव किरण साळी यांचे फलटण शहरातील नाना पाटील चौक येथे राजे ग्रुपच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांनी शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजे ग्रुपच्या वतीने या स्वागताचे नियोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या फलटण नगरीत किरण साळी यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांनी शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने किरण साळी यांचा सत्कार केला. याप्रसंगी शिवसेनेचे आणि युवासेनेचे स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
