युवा नेते युगेंद्र पवार आज फलटण दौऱ्यावर


दैनिक स्थैर्य | दि. १९ मार्च २०२४  | फलटण  | बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, शरयू उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्रदादा पवार हे आज फलटण दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ३ वाजता जेष्ठ नेते स्व. सुभाष शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी हितगुज करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व साहेब प्रेमी कार्यरत राहणार आहोत. युगेंद्रदादा पवार हे नक्कीच फलटण तालुक्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा उद्योजक युगेंद्रदादा पवार हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य युवकांना रोजगार मिळण्यासाठी काही लघु व माध्यम उद्योग सुद्धा सुरु करणार आहेत; अशी माहिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे समर्थक नंदकुमार मोरे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!