
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील वनवासवाडी (कृष्णानगर) येथे एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ जून रोजी साडे सहा वाजण्याच्या पूर्वी वनवासवाडी येथे भाड्याच्या घरात दिलशाद सलीम शेख वय २२ या युवतीने स्वयंपाक खोलीतील लोखंडी तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर आमीर सलीम शेख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.
