ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । सातारा । कोरेगाव-सातारा या मार्गावर ट्रॅक्टर अपघातात किडगाव ता. सातारा येथील युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना दि. २६ रोजी दुपारी ३.३0 वाजता कृष्णानगर पोरे स्टीलयार्डचे दुकानासमोर घडली. याबाबतच्या गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, फिर्यादी यांचा मुलगा व त्याचा मित्र मोटारसायकल क्रमांक एमए ११ अेआर ४५८३ वरुन जात असताना ट्रॅक्टर क्र. एमएच ११ सीडबल्यू ४४९१ याने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉली ही रॉग साईडने भरधाव वेगात चालवून झालेल्या अपघातात सिध्देश राजेंद्र इंगवले वय १७ या युवकाचा मृत्यू झाला तर अर्थव मनोजकुमार चोरे वय १७ हा गंभीर जखमी झाला आहे. दोघे रा. किडगाव सातारा अशी त्यांची नावे आहेत. याबाबतच्या तक्रारीनंतर संकेत कल्याण पन्हाळे वय २0 रा. जैतापुर ता. सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पोलिस हवालदार कारळे हे करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!