
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । सातारा । सातारा शहरातील ढोणे कॉलनीत राहणारा युवक शुभम विजय बर्गे (वय 23) याने शनिवार दि. 2 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, शुभमने घरातील फॅनला कमरेच्या पट्ट्याने गळफास घेतला. तो बारावी उत्तीर्ण असून त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र, समजू शकलेले नाही. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
