दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । सातारा । पाटखळ ता. सातारा गावच्या हद्दीत वडजाई मंदिराच्या पाठीमागे बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाचे पैसे संबंधित दोघांना मागूनही वेळेवर न दिल्याने तणाव वाढल्याने जितेंद्र रविंद्र शिंदे वय २६ या युवकाने नैराश्यातून आत्महत्या केली. त्यानंतर अधिक उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार वडील रविंद्र शिंदे यांनी सातारा तालुका पोलीस स्टेशनला दिल्यानंतर याप्रकरणी शंकर रामचंद्र शिंदे, अमर रामचंद्र शिंदे दोघे रा. पाटखळ ता. सातारा यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.