तुमच्या मोबाइल बिलात होणार 20 टक्के वाढ


 

स्थैर्य, दि.२०: देशातील तीनही दूरसंचार
कंपन्या व्होडा-आयडिया, एअरटेल व रिलायन्स जिओ लवकरच सेवा महाग करण्याच्या
तयारीत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही महिन्यांत दरवाढ कधीही
होऊ शकते. तीनही कंपन्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ करतील, असा
तज्ज्ञांचा अंदाज आहे. वित्तीय सेवा कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल
सर्व्हिसेसचे संशोधन उपाध्यक्ष अली असगर शाकिर यांच्यानुसार आधी व्होडा-
आयडिया दरात वाढ करील आणि त्यानंतर एअरटेल व जिओ त्यांचे अनुकरण करतील.
कारण एअरटेल आणि जिओ यांना आधी दर वाढवून त्यांचे ग्राहक गमवायचे नाहीत.
अली असगर सांगतात की, बहुतांश आर्थिक उलाढाल कोरोनाच्या आधीच्या पातळीवर
गेल्याने अपेक्षेआधीही दरात वाढ होऊ शकते. तर आनंद राठी सिक्युरिटीजचे
दूरसंचार विश्लेषक नरेंद्र सोळंकी सांगतात की, दूरसंचारचे दर वाढणे नक्की
आहे. फक्त ते नूतन वर्षाच्या आधी वाढतात की नवीन वर्षानंतर हे बघावे लागेल.
त्यांच्यानुसार दरात १० टक्क्यांच्या आसपास वाढ होऊ शकते. यासाठी
व्होडा-आयडिया पहिले पाऊल टाकील. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या
एका अहवालानुसार दरात २० टक्के वाढ झाल्यास एअरटेलचा प्रतिव्यक्ती महसूल
वाढून १७८ रुपये, जिओचा १६७ रुपये व व्होडा-आयडियाचा महसूल १४० रुपये होईल.
अली असगर सांगतात की, महसुलातील वाढीमुळे व्होडा-आयडियाचा रोकड प्रवाह तर
वाढेल, पण त्यांचा खर्च भागणार नाही.

यंदाचा औंध संगीत महोत्सव 22नोव्हेंबर रोजी आँनलाईन सादर होणार; दिग्गज गायकांचे होणार शास्त्रीय गायन

व्होडा-आयडियात ऑकट्री करू शकते १५ हजार कोटी रुपयांची गंुतवणूक

भारतातील
संकटग्रस्त दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियात अमेरिकन अॅसेट मॅनेजमेंट
कंपनी ऑकट्री कॅपिटलने कमीत कमी दोन अब्ज डॉलरची (१४८५३ कोटी रुपये)
गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ऑकट्रीने या संभाव्य व्यवहारासाठी
वरदेसह अनेक कंपन्यांसोबत गट बनवला आहे. या गुंतवणूकदार समूहाने २ ते २.५
अब्ज डाॅलरचा निधी व्होडाफोन-आयडियाला उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला
आहे. ऑकट्रीच्या या गटासोबतच्या संभाव्य व्यवहार कसा असेल हे सध्या स्पष्ट
नाही. सप्टेंबरमध्ये व्होडा-आयडियाने म्हटले होते की, भारतीय वायरलेस
इंडस्ट्रीत स्पर्धा वाढल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेअर व
कर्जाद्वारे जवळपास २५ हजार कोटी रुपयांचा निधी जमवण्याची योजना आखत आहेत.
याच्याशी संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे की, व्होडा-आयडियाची इतर संभाव्य
गुंतवणूकदारांसोबतही चर्चा सुरू आहे. याबाबत ऑकट्री, वर्दे व व्होडाफोन
आयडियाच्या प्रतिनिधींनी बोलण्यास नकार दिला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!