आपचा आरोप – केजरीवाल यांना नजरबंद केले; पंजाबच्या काँग्रेस खासदारांचे जंतर-मंतरवर आंदोलन


 

स्थैर्य, दि.८: शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आज
भारत बंद आहे. 20 राजकीय पक्ष आणि 10 ट्रेंड युनियन्स याला सपोर्ट करत
आहेत. याच काळात, आम आदमी पार्टीने (AAP)आरोप लावला आहे की, दिल्ली
पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरात नजरबंद केले आहे.
त्यांच्या घरातील कोणालाही बाहेर येण्या-जाण्याची परवानगी नाही. पोलिसांनी
हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी म्हटले आहे की, दिल्लीचे
मुख्यमंत्री असल्याच्या नात्याने केजरीवाल कुठेही जाऊ शकतात. तिकडे,
पंजाबच्या काँग्रेस खासदारांनी दिल्लीत जंतर-मंतरवर धरने आंदोलन केले आहे.

आपचा
आरोप आहे की, गृह मंत्रालयाच्या आदेशावर पोलिसांनी दिल्ली महापालिकेच्या
तीन्ही महापौरांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या मुख्य
गेटबाहेर धरने आंदोलनासाठी बसवले आहे. याचे निमित्त करत पोलिसांनी
मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर बॅरिकेडिंग केली आहे. यामुळे केजरीवाल यांना
कुणीही भेटायला येऊ शकत नाही आणि ते बाहेरही जाऊ शकत नाहीत.

तर
आपचे नेते संजय सिंह यांनी ट्विट केले आहे की, ‘काल मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल सिंघु बॉर्डवर शेतकऱ्यांना भेटून घरी परत आले. त्यानंतर गृहमंत्री
अमित शाहांच्या आदेशावर हाउस अरेस्ट केले आहे. अरविंद केजरीवाल भारत
बंदच्या समर्थनार्थ बाहेर निघू शकू नयेत म्हणून त्यांना अटक करण्यात आली.’

शेतकरी म्हणाले – सरकारने लिहून दिले तरच मानू
गाजीपुर-गाजियाबाद
बॉर्डरवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. ते म्हणत आहेत की, जर सरकार
कायद्या बनवू शकते तर तो परतही घेतला जाऊ शकतो. सरकारला शेतकरी संघटना आणि
एक्सपर्ट्ससोबत मिळून काम केले पाहिजे. तेव्हाच आम्ही मागे हटू, आम्हाला
लिहून दिल्यानंतरच आम्ही या सर्वांवर विश्वास ठेवू.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!