
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । सातारा । राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची खबर भुईंज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सायली दयानंद कांबळे वय 20 राहणार धोम पुनर्वसन, पोष्ट, ओझर्डे, तालुका वाई ही युवती राहत्या घरातून कोणासही काही न सांगता निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद दयानंद भगवान कांबळे वय 47 यांनी भुईंज पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
