विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । कोरेगाव ।  कोरेगाव तालुक्यातील सांगवी येथील एका युवतीने विषारी औषध प्राशन केले. ही घटना दि. २७ जून रोजी घडली. यानंतर तिला अधिक उपचारार्थ क्रांतसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. २७ जून रोजी सांगवी गावच्या हद्दीत शेतामध्ये तेथीलच उत्कर्षा सुनिल सुतार वय १८ हिने विषारी औषध प्राशन केल्याने तिला प्रथम सातारा येथील खाजगी रुग्णालयात, त्यानंतर पुढील उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. साळुंखे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!