दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२३ । मुंबई । आज विधानभवनमध्ये कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सरकारने कोट्यवधी रुपये यांनी खर्च केले, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केले.
अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. आता अनेक गाड्यांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिसतात. आता यांना आम्हाला बघायचं नाही तरी का दाखवता?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. तसेच एकनाथ शिंदे म्हणतात की, सतत माझ्यावर तुम्ही टीका करतात. मात्र तुम्ही काम करत नाही केवळ दाढी कुरवाळत बसता. काम करा मी कौतुक करेल, अशी टीका अजित पवारांनी केली.
राज्यात दंगल का घडतेय? त्याचा मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येतं आहे. धाराशिव मध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. पुण्यात कोयता गँग त्रास वाढला आहे. पोलिस यंत्रणा चांगली आहे परंतु सरकार कमी पडत आहे. पोलिसांना मोकळीक मिळत नाही, त्यात हस्तक्षेप वाढत आहे. राज्याला शोभा देणाऱ्या गोष्टी नाही, असं अजित पवारांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सदर कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असला पाहिजे यासाठी आतापासूनच कंबर कसूया. यात अडथळे अनेक येतील हिंदुत्वाची गोळी घेऊन कोण आले तर त्यांना आरसा दाखवा. जो शिवछत्रपती यांचा असेल. पुढील मकरसंक्रांतीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. तेव्हा पुन्हा उन्माद माजेल. पण धनुष्यबाण हाती घेतलेले व भुवया उंचावणारे प्रभू श्रीराम हवेत की कुटुंबवत्सल आशीर्वाद देणारे प्रभू श्रीराम हवेत, असे विचारावे लागेल, असं अमोल कोल्हे म्हणाले.