विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांच्या विधानावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया


दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२३ । मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे विधान केले. यावरून आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर भाष्य केले आहे.

अलीकडेच खासदार सुप्रिया सुळेंना पक्षाचे कार्याध्यक्ष केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याचीही चर्चा केली जाते. या एकंदरीत घडामोडींबाबत अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला. मीडियाशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, हा फार मोठ्या स्तरावरचा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारला आहे. अजित पवारांसारखा सक्षम नेता जेव्हा ही भूमिका मांडतो तेव्हा असे दिसते की, संघटनेतील कामासाठी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असावी. तसे असेल तर सर्व कार्यकर्त्यांना आनंदच आहे, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!