यशवंत विचारांच्या वारसदारांला यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार


दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२२ । सातारा । समाजकारण, राजकारण, सहकार यासह विविध क्षेत्रात निष्कलंकपणे, पारदर्शक काम करणारे राज्याचे सहकार पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे “यशवंत विचारांच्या वारसदारांला यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार” देऊन गौरवण्यात येत असल्याबद्दल सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्तुत्वचा घेतलेला मागोवा.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विद्यमान महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील सहकार पणन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शांत, संयमी स्वभावाबद्दल आता मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वभावा वैशिष्ट्याबाबत महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली आहे. राजकारणात अतिघाई करण्यापेक्षा आपणाला दीर्घ काळाचा पल्ला गाठायचा आहे. समाजातील सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेवून मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजकीय वाटचाल अतिशय संयमाने सुरू ठेवली आहे.

आमदारकीचे रौप्यमहोत्सवी वर्ष मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सुरू आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि प्रत्येक गावात विकासाची कामे गतीने उभी करण्यासाठी मंत्री बाळासाहेब पाटील सातत्याने प्रयत्न करतात. विशेष म्हणजे झालेल्या कामाचा कधीच गाजावाजा करत नाहीत. अथवा प्रसिद्धी माध्यमांद्वारे कामांचा बोलबाला व्हावा अशी साधी अपेक्षाही ठेवत नाहीत. हिच मंत्री बाळासाहेब पाटील यांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. वास्तविक पाहता शांत, संयमी स्वभावाचा काय फायदा होतो ? हे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा मागोवा घेतला तर निश्चितपणे लक्षात येईल. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते चेअरमन आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ते कॅबिनेट मंत्री हा प्रवास निश्चितच गौरवास्पद व कौतुकास्पद असा आहे. दरम्यान अनेक सत्तास्थाने आपल्या हाती असताना देखील अहंपणाचा भाव मनी न बाळगता तसेच सत्ता ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी व त्यांचे सकारात्मक काम करण्यासाठी आहे. या भावनेतून मंत्री बाळासाहेब पाटील हे आजही येणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांनाबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांची, मित्रांची कामे तितक्याच प्रामाणिकपणे करण्याचा मापदंड मंत्री बाळासाहेब पाटील यांचा आहे.

मोठेपणाचा अविर्भाव, खोटे आश्वासन, कार्यकर्ते व संबंधितांना खेळवत ठेवणे. एखाद्या व्यक्तीच्या कामाबाबत करतो, पाहतो, बघतो ही भाषा कधीही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभापासून ठेवलेली नाही. जे करणे शक्य आहे, ते प्रामाणिकपणे व परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न आजही करताहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचे आणि सध्या मंत्रीपदापर्यंत वाटचाल केलेले बाळासाहेब पाटील यांच्या स्वभावांमध्ये तिळमात्र बदल झालेला नाही. अथवा सत्तेच्या अत्युच्च शिखरावर असताना देखील त्यांचे जमिनीवर पाय घट्ट आहेत. हीच राजकारणात यशस्वी होण्याची ताकत असेल असे निश्चित वाटते. विरोधकांच्यावर कधीही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक हल्ला केला नाही. विशेषता विरोधक सातत्याने या ना त्या प्रकारे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करीत असतात. मात्र त्याला प्रतिउत्तर ही घाईगडबडीत द्यावे असा आततायीपणा कधी करीत नाहीत. एखाद्याने आरोप केला तरी तो सत्य की असत्य हा समाज ठरवित असतो. समाजाला आरोप करणारी व्यक्ती व मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यातील अंतर, फरक माहीत असतो. त्यामुळे आपण होऊन झालेल्या आरोपाला उत्तर देण्यापेक्षा समाज त्याचे मूल्यमापन करतो. मग कशाला उगाच एखाद्याला महत्त्व द्यायचे.  या भावनेतून मंत्री बाळासाहेब पाटील यांची वाटचाल सुरू असते.

सहकार व पणन मंत्री  बाळासाहेब पाटील यांची समाजकारण व राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक व त्यानंतर कारखान्याच्या चेअरमनपदाची यशस्वी धुरा त्यांनी आज तागायत सांभाळलेली आहे. देशाचे नेते स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांना अभिप्रेत असणारा सह्याद्री कारखाना कराड उत्तरचे भाग्यविधाते स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांनी चालवला. त्याच क्षमतेने  विद्यमान चेअरमन व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील चालवत आहेत. केवळ कारखानाच चालवतच नाहीत तर ते राज्यात “सह्याद्री पॅटर्न” म्हणून कारखान्याची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.

सहकारातील अभ्यासू वृत्तीमुळेच देशाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बाळासाहेब पाटील यांना राज्य सहकारी साखर संघाचे संचालक, उपाध्यक्ष व अध्यक्षपदी दोन वेळा काम करण्याची संधी दिली तसेच राष्ट्रीय साखर संघाचे दक्षिणमध्य महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक दाखवली. बाळासाहेब पाटील यांच्या सहकारातील अभ्यासामुळे देशाचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब पाटील यांच्यावर सहकार व पणन खात्याची जबाबदारी देत विश्वास दाखवला, हीच त्यांच्या सहकाराममध्ये दाखवलेल्या कर्तृत्वाची पोचपावती आहे. बाळासाहेब पाटील यांना त्यांच्या शांत संयमी स्वभावामुळे समाजात वेगळे स्थान आहे.

बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या चारित्र्यावर डाग लागून दिला नाही. ही त्यांची जमेची बाजू आहे. सहकारासारख्या क्षेत्रात काम करताना निष्कलंक व पारदर्शी व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सहकार चळवळ भक्कम होण्यासाठी बळ दिले आहे. गतकाळात बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण स्वत:ला झालेली असताना त्यावर उपचार घेऊन झालेनंतर लगेच दुस-या दिवशी कामास सुरुवात केली. परंपरेपेक्षाही पारदर्शी नेतृत्व व  कर्तुत्व आणि यशवंत विचार जिवंत ठेवणारे व तळागाळापर्यंत पोहोचवणारे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे एकमेव राज्यातील नेते आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गोरख तावरे
कराड – 9326711721


Back to top button
Don`t copy text!