
स्थैर्य, फलटण, दि. 19 ऑगस्ट : छायाचित्र हा विषय आता व्यवसायिक, उद्योग,छंद,मुद्रण माध्यमात अत्यंत प्रतिष्ठेचा व कलात्मक जीवनातील महत्त्वाचा संवेदनशील भाग आहे. छायाचित्रण छंद म्हणून जोपसणारा वास्तववादी चित्रण करणारा व मनाला मानसाला आत्मिक आनंद देणारी कलाकृती आहे. आज दि. 19 (ऑगस्ट) आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्र बद्दल लेखन प्रपंच….
जग प्रचंड वेगाने बदलत आहे.आधुनिक तंत्रज्ञान संगणक इंटरनेट सोशल मीडिया अशा विविध अंगांनी जगातील समृद्ध संपन्न मानवी जीवनाला उपयुक्त व घातक बदल अत्यंत प्रचंड वेगाने होत आहेत.युवा पिढीच्या हातात सारं जग भ्रमणध्वनी माध्यमातून एकवटलं आहे.
अशा पार्श्वभूमीवर अत्यंत प्राचीन काळापासून छायाचित्र रेखाटन हि कलाकृती मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.छायाचित्रण कलाक्षेत्रातील परंपरा व बदल काळाच्या ओघात होत आहेत.सकारात्मक व नाकारात्मक अशा बदलाच्या चक्रव्यूहात समाज नेहमी वाटचाल करत काळाच्या ओघात पुढेपुढे सरकत असतो. छायाचित्रं कलाप्रेमी माणूस माणसं जोडणारा दुवा आहे.
एक छायाचित्र हजारों शब्दाचं काम करत.छायाचित्र बोलकी व मानवी जीवनातील उच्च आत्मिक समाधान देणारी संस्काराची शिदोरी आहे.निसर्ग,पक्षी, वृक्ष वेली, झाडे, झुडपे, फुलं,उगवणारा सुर्योदय व मावळणारा सुर्यास्त यासारखे देखावे,चंद्राचे अगणित छायाचित्र प्रसिद्ध झाली आहेत.दहिहंडी, गणपती उत्सव,दिवाळी,पाडवा,बेंदूर,शेती, विविध मंदिरे, महापूर,भुकंप, अतिवृष्टी, ढगफुटी, निसर्गातील अनेक चमत्कार अशा विविध भावमुद्रा प्रसंगांचे छायाचित्र हि सर्वत्र मानवी समुहाला गरजेची वाटतात.
श्री. अनिलकुमार बुवासाहेब कदम (लेखक, साहित्यिक, मुक्त पत्रकार)
उध्दव दमयंती, निवास, गिरवी ता. फलटण जि सातारा
मोबा. 8275214889