दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । क्रेड्युस टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने (सीटीपीएल) जगातील पहिले सुपर सस्टेनेबल ट्रेडेबल ब्लॉकचेन टोकन ‘किची’ शेअर बाजारांवर सक्रिय केले आहे. गुंतवणूकीचा कार्बन-न्यूट्रल मार्ग स्वीकारण्याची क्षमता किची व्यक्ती व व्यवसायांना देणार आहे.
किची टोकन हे एक डिजिटल असेट असून, त्याला पडताळणीकृत कार्बन क्रेडिट्सचा आधार आहे, खरेदी केल्या जाऊ शकणाऱ्या, विकल्या जाऊ शकणाऱ्या, धारण केल्या जाऊ शकणाऱ्या किंवा ज्वलन शक्य असलेल्या कार्बन क्रेडिटच्या १/१० मूल्य या डिजिटल असेटला आहे. मिंटिंगच्या पहिल्या टप्प्यात क्रेड्युसने या टोकनबद्दल मोठ्या प्रमाणात रूची निर्माण केली आहे. याची दोन दशलक्ष टोकन्स सवलतीतील दरात विकण्यात आली. संस्थात्मक ग्राहकांनी यापूर्वीच पाच दशलक्ष टोकन्स बुक केली आहेत तर पहिल्या टप्प्यात १० दशलक्षांपर्यंत विक्री करून, त्यांनी ४० संस्थात्मक व रिटेल ग्राहकांमध्ये रूची निर्माण केली आहे.
किची हे कार्बन, हायड्रो (जल), ऊर्जा व पर्यावरण कार्यक्षमता टोकन असून, संस्था व व्यक्तींपुढे हवामान बदलांना तोंड देण्यासाठी उपलब्ध उपायांची कल्पना नव्याने करण्याच्या दृष्टीने हे टोकन डिझाइन करण्यात आले आहे. किची हे, कार्बन क्रेडिट्सना एका असेटप्रमाणे पाठबळ देण्यासाठी परिश्रमपूर्वक घडवलेले व काळजीपूर्वक आच्छादलेले, ब्लॉकचेन टोकन आहे. याचा लाँच दर ०.९० डॉलर आहे आणि कंपनीने पुढील तिमाहीत १० डॉलर्स दराने एक टोकन विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजच्या तारखेला ४० संस्थात्मक ग्राहकांनी व ६० रिटेल ग्राहकांनी या अतिशाश्वत ब्लॉकचेन टोकनमध्ये रस दाखवला आहे. किची हा अधिक पर्यावरणपूरक पृथ्वीकडे जाणारा मार्ग आहे.
पर्यावरणावरील कार्बनचा परिणाम कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमासाठी व्यक्तीला, यूसीआरची मंजुरी प्राप्त केलेली कार्बन क्रेडिट्स, प्रदान केली जातात. कार्बन उत्सर्जन शून्य करणारे तसेच हवामानावरील परिणाम नियंत्रित करणारे शाश्वत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट क्रेड्युसपुढे आहे.
सीटीपीएलचे संस्थापक शैलेंद्र सिंग राव, वेब 3.0 क्षेत्रातील आधुनिक व पर्यावरणाची जाणीव ठेवणाऱ्या दृष्टिकोनाबद्दल म्हणाले, “डिजिटल असेट्सच्या मालकीबद्दल पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवण्याची परिणती कार्बन क्रेडिट रिवॉर्डसमध्ये झाली आहे. ही क्रेडिट्स हवामानाप्रती सजगता राखणाऱ्या तसेच पर्यावरणपूरक गुंतवणूकींच्या माध्यमातून प्राप्त केली जाऊ शकतात. इंटरनेटची डिजिटलाइझ्ड, विकेंद्रीकृत व लोकशाही स्वरूपाची व्हर्जन्स दृष्टिपथात असल्यामुळे, किचीसारखे टोकन सर्वांपुढे तातडीने आणण्याची गरज आहे, असे आम्हाला क्रेड्युसमध्ये वाटले. किची टोकन बाळगल्यामुळे गुंतवणूकदाराला किमान हस्तक्षेपाच्या माध्यमातून हवामान बदलाप्रती थेट योगदान देता येते आणि पर्यावरण व पुढील पिढ्यांना निर्माण होणारा धोका लक्षणीयरित्या कमी करता येतो. सस्टेनिबिलिटी क्रेडिट्स टोकनच्या स्वरूपात आणणे आणि त्यायोगे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे तसेच प्रत्येकासाठी सहकार्याधारित, शाश्वत व सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे ही कामे पुढे नेणे हा किचीमागील हेतू आहे.”