उपविभागीय कृषी अधिकारी कराड कार्यालयामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । सातारा । एकात्मिक फलोत्पादन विकास 2022-23 अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे उपविभागीय कृषि अधिकारी, कराड यांनी कळविले आहे.

या प्रशिक्षणामध्ये फळबाग,भाजीपाला, फुले लागवड, फळबाग व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, एकात्मिक किड-रोग व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन,कृषी पर्यटन बाबत अहमदनगर, पुणे व नाशिक  विभागातील कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठे, प्रगतशील शेतकरी यांच्या प्रक्षेत्रावर भेटीचे नियोजित करण्यात आले आहे. उपविभागातील कराड व पाटण या तालुक्यांतून प्रत्येकी पंधरा शेतकरी प्रमाणे लक्षांक प्राप्त आहे.

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 10 सप्टेंबर 2022 पर्यत अर्ज भरुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, कराड यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!