
दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । मुंबई । बौद्धजन पंचायत समिती संलग्न महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मंडळ अध्यक्षा सुशिलाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृज, भोईवाडा, परेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी मध्यवर्ती महिला मंडळाचे सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. जेष्ठ साहित्यिका मा. उर्मिलाताई पवार व साहित्यिका मा. नंदा कांबळे-मोरे या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या तसेच उपसभापती विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, उपकार्याध्यक्ष अशोकजी कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमणी तांबे, अंकुश सकपाळ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सदर प्रसंगी महिलांचे महत्व नमूद करताना “आदिमकाळात मानव टोळ्यांनी राहत होता जो अन्न व पाणी याकरता भटकंती करत असताना रानोवनी भटकायचा व त्यामुळे महिलांना त्रास नको म्हणून त्याना एका सुरक्षित ठिकाणी ठेवल जायच त्याठिकाणी राहताना महिलांनी बी रोवल की पुन्हा उगवत हा शोध लावला व त्यातूनच पुढे शेती विकसित होत गेली, सोबतच स्त्रीच्या गर्भात ही गर्भधारणा होऊन नवीन जीव जन्मास येतो म्हणून स्त्री ही मातृदेवता म्हणून नावारूपास आली व त्यामुळे मातृसत्ताक समाज निर्माण झाला असे आदिम काळापासून स्त्रीचे महत्व आहे” असे उद्गार प्रमुख वक्त्या उर्मिलाताई पवार यांनी काढले.
सदर प्रसंगी समितीचे व्यवस्थापक मंडळ, शाखा पदाधिकारी, सदस्य, सभासद, बौद्धाचार्य, महिला मंडळ व शिवडी गट क्र. १३ च्या महिला सभासद यांनी उपस्थित लावली होती, शिवडी गट क्र. १३ च्या महिलांनी लक्षणीय उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सरतेशेवटी सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल संलग्न सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, कार्यकर्ते यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.