कार्यकर्त्यांनो तयारीला लागा; ग्रामपंचातीची आचारसंहिता लागू; फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. 

मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व  ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

फलटण तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती

परहर बु|| या पुनर्वसित, धुळदेव, निंभोरे, ढवळेवाडी (निं), जाधववाडी(फ), सस्तेवाडी, झिरपवाडी, शिंदेनगर, पवारवाडी, सरडे, मुंजवडी, निंबळक, जावली, तिरकवाडी, राजुरी, आंदरुड, सासकल, बोडकेवाडी, निरगुडी, तावडी, विंचूरणी, सांगवी, टाकळवाडे, राजाळे, कांबळेश्वर, कापडगाव, रावडी खु||, जिंती, घाडगेमळा, आळजापूर, शेरेचीवाडी(हिं), वाखरी, हिंगणगाव, वाघोशी, घाडगेवाडी, साठे, बिबी, कोऱ्हाळे, वडगाव, मलवडी, कोळकी, वडजल, आलगुडेवाडी, ठाकुरकी, काशीदवाडी, फरांदवाडी, खुंटे, शिंदेवाडी, भिलकटी, हणमंतवाडी, गुणवरे, कुरवली बु||, नाइकबोमवाडी, मिरढे, शेरेशिंदेवाडी, भाडळी बु||, भाडळी खु||, ढवळ, धुमाळवाडी, सोनगाव, पिंपळवाडी, सोनवडी बु||, सोनवडी खु||, कोरेगाव, आरडगाव, तांबवे, रावडी बु||, तडवळे, डोंबाळवाडी, खराडेवाडी, काळज, होळ, मुरुम, खामगाव, नांदल, मुळीकवाडी, कापशी.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

> नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले.

> 25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!