स्थैर्य, दि.२०: महिला क्रिकेट पहिल्यांदा २०२२ बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत खेळवले जातील. एकूण क्रिकेटचा विचार केल्यास या स्पर्धेत दुसऱ्यांदा या खेळाला स्थान मिळाले. या पूर्वी १९९८ मध्ये पुरुष क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. स्पर्धेसाठी आयसीसीने बुधवारी पात्रतेचे नियम घोषित केले. यजमान इंग्लंड व क्रमवारीतील अव्वल-६ टीम थेट पात्र ठरतील. आठव्या व अखेरच्या टीमसाठी पात्रता सामने खेळवले जातील. पात्रता कोणत्या आधारे होईल, त्याची घोषणा नंतर केली जाईल. स्पर्धेत एकूण आठ संघ खेळतील. महिला टी-२० स्पर्धेचे महत्त्व वाढले, कारण ऑस्ट्रेलिया झालेल्या टी-२० विश्वचषकाची फायनल पाहण्यासाठी ८६ हजार प्रेक्षक आले होते.
तुमच्या मोबाइल बिलात होणार 20 टक्के वाढ
क्रमवारीत भारतीय महिला टीम तिसऱ्या स्थानी
टी-२० क्रमवारीमध्ये इंग्लंड दुसऱ्या, भारत तिसऱ्या, न्यूझीलंड चौथा, दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि वेस्ट इंडीज सहाव्या स्थानी आहे. इंग्लंड यजमान असल्याने त्यांना स्पर्धेत स्थान मिळले. अशात क्रमवारीतील सातव्या स्थानावरील पाकिस्तानला संधी मिळू शकते. अशात स्पर्धेच्या पात्रतेसाठी १ एप्रिल २०२१ ची क्रमवारी पाहिली जाईल. पात्रता सामने ३१ जानेवारी २०२२ दरम्यान आयोजित जातील. स्पर्धेतील सामने १८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान होतील.