
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 18 एप्रिल 2025। सातारा ।महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील नियोजन भवनात सोमवार दि. 21 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली आहे.
महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करणार्या महिलांनी करावयाचे विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत करणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे.
