
दैनिक स्थैर्य | दि. २० मार्च २०२३ | फलटण |
महिला आर्थिक विकास महामंडळ व ओमसाई लोकसंचलित साधन केंद्र फलटण यांच्यातर्फे ८ मार्च महिला दिन व ‘घर दोघांचे’ जनजागृती अभियान कार्यक्रम विठ्ठलवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे घेण्यात आला.
यावेळी विठ्ठलवाडीच्या सरपंच सौ. शितल कोरडे, ओमसाईच्या कार्यकारिणी सदस्या सौ. यमुना कोरडे, CRP अनिता कोरडे , ओमसाईच्या विठ्ठलवाडी कार्यकारिणी सदस्या अनिता गायकवाड यांच्या हस्ते क्रांतिअग्रणी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्ज्वलन करण्यात आले. ‘इतनी शक्ती देना दाता’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहयोगिनी सोनाली पाटोळे मॅडम यांनी केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सहयोगिनी सोनाली पाटोळे मॅडम यांनी घर दोघांचे अभियान व लक्ष्मी मुक्ती योजना यांविषयी महिलांना माहिती सांगितली. कार्यकारिणी सदस्या यमुना कोरडे व अनिता कोरडे यांनी आभार व्यक्त केले.