सोनकिरे येथे महिलांनी बुद्ध पौर्णिमा केली साजरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । सांगली । सोनकिरे येथे दि. १६ मे २०२२ रोजी भीमनगर मधील सर्व तरुणींनी- महिलांनी पुढे येऊन सर्व जबाबदारी स्वीकारून अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कार्यक्रम पार पाडले. बुद्ध पौर्णिमनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, मेहंदी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले होते. त्यांनी या केलेल्या कार्यक्रमाला समाजातील सर्व बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी दिक्षा गोतपागर, प्रास्ताविक प्रतीक्षा थोरात , सचिव दिक्षा सचिन गोतपागर व उपाध्यक्ष सायली थोरात यांनी हा कार्यक्रम पार पाडला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!