स्थैर्य, सातारा, दि.८: सातारा शहराचे नागरीकरण झपाटयाने वाढत असताना सुविधेचा मात्र उणिवा सगळीकडे भासत आहे शहरातील नागरिकाच्या मूलभूत प्रष्नाची सोडवणूक वेळेत होत नसल्याने नागरिकाना अनेक वेगवेगळया समस्याचा सामना करावा लागतो विषेशता महिलावर्गाची तर फारच कुंचबना होत असते षहराच्या वेगवेगळया भागात व्यवसाय व कामनिमित बाहेर पडणाऱ्या महिला वर्गाना नैसगिक विधीच्या षोधासाठी शौचालय शोधण्यासाठी धडपड करावी लागती शहराच्या अनेक भागात महिलासाठी स्वच्छतागृहच उपलब्ध नसल्याने महिलाना अनेकदा उघडयावरच नैसगिक विधी करावा लागतो हे शहराच्या दुश्टीने दुर्देवी बाब आहे शहराच्या विकासासाठी षासनस्तरावरुन व जनतेतून कर रुपातून येणारा कोटयावधी रुपयाचा निधी पाहाता या प्रष्नाकडे संबधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे खरे तर गरजेचे आहे सातारा शहरात दररोज ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला वर्गाची संख्या हि अधिक आहे त्यामानाने शहरात काही मोजकीच महिलासाठी स्वच्छजागृह आहेत यामध्ये राजवाडा जुना मोटर स्टॅड एस टी स्टॅड परिसर वगळता अन्य ठिकाणी कोठेच महिलासाठी स्वच्छातागृहाची सोय नाही महिलावर्गाची अडचण जाणून खरे तर षहराच्या वेगवेगळया भागात विषेशता मुख्य रस्त्यालगत विविध ठिकाणी स्वच्छतागृहाची निर्मिती यापूर्वी होणे अपैक्षित होती महिलावर्गाकडे केवळ निवडणूकी पुरतेच लक्ष देणार्यांनी महिलाच्या प्रष्नाबाबत हि गांभीर्याने लक्ष देणे अपैक्षित असल्याचे मत महिलावर्गातून व्यक्त होत आहे रोजगार स्वयरोजगार व वेगवेगळया कामनिमित साताऱ्यात येणाऱ्या महिलावर्गाना पुरेषा प्रमाणत शौचालय उपलब्ध नसल्याने या वर्गाची मोठी कुंचबणा होते विषेशता जेश्ठ महिला महाविद्यालय तरुणाई यांना अधिक त्रास होतो शहरातील वेगवेगळया शासकिय निमशासकिय कार्यालयात कामकाजासाठी ये जा करणाऱ्या महिलाना अनेकदा आजारी नातेवाईकाना भेटण्यासाठी सिव्हिल हाॅस्पीटल तसेच विविध कामासाठी जिल्हा परिशदेमध्ये ग्रामीण भागातील महिलाना यावे लागते अशावेळी या मार्गवर स्वच्छतागृहाची सोयच नसल्याने या महिलाना आडोशाचा आधार घ्यावा लागतो सध्या कोरोनाचे महाभंयकर संकट उभे आहे स्वच्छता ही सर्वात महत्वाची बाब आहे अशा वेळी उघडयावर शौचालय केल्याने रोगराईलाच निमंत्रण मिळते संबधित यंत्रणेने जागरुकता दाखवून शहराच्या विविध भागात स्वच्छजागृहाची संख्या वाढविणे आवष्यक आहे.
शेटे चोक ते पोवईनाका, देवीचैक ते पोवईनाका ,पोवईनाका ते सिव्हील हाॅस्पीटल ,मोतीचैक ते मोळाचा ओेढा ,समर्थमंदीर ते बोगदा परिसर, राजवाडा ते षाहुपूरी ,करजे ते नेताजी सुभाशचंद्र बोस चैक, पोवईनाका ते गोडोली ,जिल्हापरिषद ते विकासनगर या मार्गवर महिलासाठी स्वच्छतागृह उभारणी अत्यंत गरजेचे आहे.
निवडणूकीच्या काळात महिलावर्गासाठी मोठमोठी स्वप्ने दाखवून मते घेणाऱ्या उमेदवाराना निवडणूकीनंतर विसर पडला आहे महिलासाठी जागोजागी स्वच्छतागृह उभारणीची आष्वसने देणार्यांनी आता या विशयाकडे पाठ फिरविली आहे शहरीभागाबरोबरच ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलाची संख्या अधिक आहे त्याच्या सुरक्षितेबरोबर स्वच्छतागृहाची निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे.
– श्रीरंग काटेकर सातारा