
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.२५: दारुच्या नशेत महिलेचा विनयभंग करत मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला.
अशोक चव्हाण, सचिन चव्हाण, गणेश पवार यांच्यासह तीन महिलांवर (सर्व रा.आरळे ता.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून याप्रकरणी सातारा तालुक्यातील महिलेने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, संशयितांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
