
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.१९: सातारा येथील आरटीओ कार्यालयाच्या गेटजवळील अंडाबुर्जीच्या गाड्याजवळ महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकास अटक केली आहे. बजरंग पवार असे संशयिताचे नाव आहे.
संबंधित महिला त्या परिसरातून दि. 17 रोजी रात्री 8.21 च्या सुमारास जात होती. यावेळी बजरंग पवार याने त्या महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बजरंगला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पो. ना. मोहिते तपास करत आहेत.
