फलटण नगरपरिषद व ‘कमिन्स’च्या मदतीने अधिकारगृहाचा आवार बहरणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.११: येथील अधिकारगृह परिसरात असलेल्या प्रांत कार्यालयाबाहेरील असलेला बगीचा नव्याने फुलवण्याचे काम सुरवडी (ता.फलटण) येथील ‘कमिन्स इंडिया प्रा.लि;’ , फलटण नगरपरिषद व फलटण उपविभागीय कार्यालयाने हाती घेतले असून यामुळे लवकरच हा परिसर नव्याने बहरणार आहे.

अधिकारगृह परिसरात तार कंपाऊंडमध्ये असलेल्या छोटेखानी बगिचामध्ये काही छोटी, मोठी झाडे पूर्वीपासूनच आहेत. मात्र आता नव्याने या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम हाती घेवून नव्या व आकर्षक पद्धतीने हा परिसर फुलवण्याचे कमा सध्या प्रगतीपथावर आहे. सदरचे काम पूर्ण झाल्यावर परिसराची निश्‍चितपणे आणखीन शोभा वाढेल, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!