फलटणकरांचा संकलित कर माफ करा; समशेरसिंह नाईक निंबाळकर 


स्थैर्य, फलटण, दि.११: कोरोना’ च्या संकटामुळे सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत आहे. अशा परिस्थितीत पालिकेने यावर्षीचा संकलित कर भरण्याचे नागरिकांना सांगितले आहे. या कठीण परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणे गरजेचे असून नगराध्यक्षांनी तातडीने विशेष सभा बोलवून फलटणकरांचा कोरोना काळातील संकलीत कर सरसकट माफ करावा; अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

संपूर्ण जगामध्ये कोरोना ह्या जीवघेण्या आजाराने थैमान घातलेले होते. काही महिन्यांसाठी सर्वांचेच जन जीवन ठप्प झालेले होते. संपूर्ण देश हा काही महिन्यांसाठी बंद म्हणजेच लॉकडाऊन मध्ये होता. त्या मुले मध्यमवर्गीय म्हणजेच हातावरचे पोट असणार्‍या सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. आधीच कोरोनच्या परिस्थितीशी लढून बाहेर निघत असताना फलटण नगरपालिकेने घरपट्टी, पाणी पट्टी आकारली आहे व त्यावर व्याज सुद्धा आकारले आहे. तरी कोरोना व लॉकडाऊन मधील कालावधी मधील महिन्यांची घरपट्टी व पाणी पट्टी आकारू नये. या जागतिक महामारीचा फटका फटका सर्व सामान्य जनतेला बसला आहे. त्यामुळे जनतेला हलाखीचे दिवस बघावे लागले असे असताना पालिकेची कर वसुली त्यांना आणखीन संकटात टाकणारी आहे. त्यामुळे कराचा बोजा सामान्य नागरिकांच्या मानगुटीवर न टाकता त्यांचे कर माफ करण्यासाठी फलटणच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलवावी. या कर माफीसाठी विरोधी पक्षाचा संपूर्ण पाठिंबा राहील, असेही समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निवेदनात स्पष्ट केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!