
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, कोळकी, दि. ६ : कोळकी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 मधून धर्मराज देशपांडे व प्रभाग क्रमांक ४ मधून स्वप्नाली पंडित हे अधिकृत उमेदवार उभे राहिलेले आहेत. तरी कोळकी मधील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व प्रभागातील सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अनुप शहा यांनी केलेले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोळकी ग्रामपंचायतीची निवडणूक भारतीय जनता पार्टी लढवत आहे. तरी आगामी काळामध्ये कोळकी गावचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना बहुमताने विजयी करावे, असे हि आवाहन नगरसेवक अनुप शहा यांनी केले.
आत्ताच्या सद्यस्थितीला कोळकी ग्रामपंचायतीचे रूपांतर हे कोळकी नगरपंचायत मध्ये होणे गरजेचे होते, परंतु सत्ताधार्यांच्या वेळखाऊ पणामुळे ग्रामपंचायतीचे रुपांतर हे नगरपंचायतीमध्ये झालेले नाही. आगामी काळामध्ये कोळकी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा कोळकी ग्रामपंचायतीचे रुपांतर कोळकी नगरपंचायतीमध्ये करण्यासाठी प्रयत्न करेल व त्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही अग्रभागी असतील, असा विश्वास यावेळी नगरसेवक अनुप शहा यांनी दिला.



