राज्यात भाजपचे सरकार येईल येईल ना. रामदास आठवले : नाराज काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ८: ज्यावेळी भाजपाकडून केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असे जाहीर केले जात होते, त्याकाळात भाजपासोबत असणारे शिवसेना नेते काही बोलले नाहीत. निकालानंतर कधीही एकत्र न एकत्र येवून तीन पक्षांचे सरकार बनवले आहे. जे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आवडले नसते ते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तथापि, हे सरकार फारवेळ टिकणार नाही. काँग्रेस महाविकास आघाडीवर नाराज असल्याने सत्तेतून बाहेर पडेल. तसेच निवडणूक टाळण्यासाठी बरेचसे आमदार भाजपाकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असा अंदाज केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवणार्‍या रिपाइंच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांचे कौतूक करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने ना. आठवले हे दोन दिवसांच्या सातारा दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी सातारा येथील विश्रामागृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत अशोक गायकवाड व पक्षाचे पदाधिकारी होते.

यावेळी ना. आठवले म्हणाले, राज्यातील सरकारचे काम योग्यरितीने चालले नाही. मुंबई येथे अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असणारी गाडी सापडणं आणि गाडी मालकाचा मृत्यू हे सारं संशयास्पद आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत आठवले म्हणाले, मोदी सरकारने जे तीन कृषी कायदे केले ते शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे, त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळावा, यासाठी केले आहे. तथापि, शेतकरी नेते कायदा मागे घ्यावा, यावरच ठाम आहेत. कोर्टाने स्टे आणूनही त्यांनी आंदोलन थांबवले नाही. कृषी कायदा मागे घेण्याच्या भुमिकेवर शेतकरी नेते ठाम राहिल्याने ही चर्चा पुढे जाईना झाली आहे. कृषी कायद्यात दुरुस्ती करण्याचे मान्य न करता शेतकरी आंदोलक कायदाच मागे घेण्याची मागणी करत आहेत. तसेच झाले तर यापुढे इतर कायदे मागे घेण्याचीही मागणी होईल. मग पार्लमेंटला अर्थच राहणार नाही. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी कायदे मागे घेण्याची भुमिका सोडून दुरुस्त्या सुचवाव्यात, असे आवाहन केंद्रीय सामाजिक मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

यावेळी प्रत्येक गावातील भुमिहीन लोकांना किमान 5 एकर जमीन देण्याच्या सरकारच्या विचाराधीन आहे. देशभरात 20 हजार जमीन उपलब्ध होईल. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात जवळपास 3000 जागांवर रिपाइंचे कार्यकर्ते निवडून आले आहेत. ज्या गावात एकही मागासवर्गीय व्यक्ती नाही, त्या गावात त्याबाबत आरक्षण पडले आहे. ही पद्धत चुकीची आहे. त्यामुळे उपसरपंच हाच गावचा कारभार हाकत आहे. त्यामुळे मागासवर्गीयांवर हा अन्याच आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांची बाजू मांडणाच बॉलीवूडच्या कलाकारांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा येतात, या प्रश्‍नावर आठवले म्हणाले सरकारचा कोणत्याी सेलिबे्रटींना त्रास द्यायचा हेतू नाही. ईडी, इन्कम टॅक्स यांच्या कामात कोणताही हस्तक्षेप नाही. आपले आयकर सर्वजणांनी वेळच्या वेळी भरावे, याबाबत जे काही कागदपत्रे शासनाकडे द्यायची असतात, त्याची वेळच्यावेळी पूर्तता केल्यास कसलीही नोटीस येणार नाही.

राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा आदेश मान्य नसावा – सध्या कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. सर्वजण मास्क वापरतात. न वापरणार्‍यांना दंड आकारला जातो. पण राज ठाकरे यांच्यासारखे नेतेच मास्क वापरत नसल्याबाबत विचारताच ना. आठवले म्हणाले, राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा आदेश मानायचा नसावा. परंतु, राज ठाकरे यांना स्वतःची काळजी नसली तरी त्यांनी इतर लोकांची काळजी करावी व मास्कचा वापर करावा, असा सल्ला ना. आठवले यांनी दिला.


Back to top button
Don`t copy text!