
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. ८: जिल्हाधिकारी यांचे आदेश मोडून रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी मोळाचा ओढा परिसरातील हॉटेल नितिराज आणि हॉटेल अतिथी या दोन हॉटेल-चालकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 6 रोजी रात्री 12 च्या सुमारास सैदापूर, ता. सातारा येथे मोळाचा ओढा परिसरात हॉटेल नितीराज सुरू असल्याचे शाहूपुरी पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी दीपक तुकाराम पवार रा. शाहूपुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तेथूनच जवळ असलेले हॉटेल अतिथी हे देखील उशिरापर्यंत सुरू होते. याप्रकरणी सुनील विजय त्रिंबके याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
