कोळकीचे सरपंचपद “बंडखोर” सदस्य ठरवणार की “निष्ठावंता”ना संधी मिळणार ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2024 | कोळकी | फलटणचे उपनगर समजल्या जाणाऱ्या व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कोळकी ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक आज संपन्न होणार आहे. यामध्ये कोळकी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून आलेले सदस्य कोळकीचा सरपंच ठरवणार ? की निष्ठावंत म्हणून पार्टी सोबत कामकाज करून निवडून आलेले कोळकीचा सरपंच ठरवणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गाव म्हणून कोळकी गावाची ओळख जिल्ह्यामध्ये आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मतदान सुद्धा कोळकी गावात आहे. गत निवडणुकीमध्ये श्रीमंत संजीवराजे यांनी दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य कोळकी ग्रामपंचायतीचा सरपंच ठरवणार ? की निष्ठावंत म्हणून कायम काम करत असलेले सदस्य कोळकी गावचे सरपंच ठरवणार ? याची चर्चा कोळकी गावामध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

कोळकी ग्रामपंचायतीचा सरपंच ठरवण्यासाठी गेले काही दिवस बंडखोरी करून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य विविध मार्गाने स्थानिक जेष्ठ नेत्यांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींकडे आपला उमेदवार घेण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत. त्यांनी लावलेली फिल्डिंगचा उपयोग होणार की सरते शेवटी निष्ठावंतांचीच मते अंतिम असणार आहेत; याचे चित्र काही वेळात स्पष्ट होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!