पवारसाहेबांसोबत विचारांचा लढा लढणार : चेतन सुभाष शिंदे


दैनिक स्थैर्य | दि. 10 एप्रिल 2024 | फलटण | लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या काळात फलटण तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती दौरा करून पुर्ण ताकदीने हा विचारांचा लढा आम्ही आदरणीय पवारसाहेबांसोबत राहुन लढणार आहोत; असे मत फलटण बाजार समितीचे संचालक चेतन सुभाष शिंदे यांनी व्यक्त केले.

फलटण येथील “जिद्द” या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत चेतन शिंदे बोलत होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की; स्व. सुभाषराव शिंदे (भाऊ) यांनी आयुष्यभर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना दैवत मानून फलटण तालुक्यात प्रत्येक गावात आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागळात रुजविण्याचे काम केले. त्यांनी कोणत्या प्रकारची जात-पात, गट-तट न मानता सर्वसामान्य, गोरगरीबासाठी काम करत असताना राजकारणाची सुरुवात ते शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहिले होते. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा कार्यरत राहणार आहे.

त्याचप्रमाणे भाऊंनी आम्हाला घालुन दिलेला आदर्श व विचार पुढे नेण्यासाठी रविवार, दि. ०७ एप्रिल २०२४ रोजी ‘गोविंद बाग’ या ठिकाणी जावुन आदरणीय पवार साहेबांचे आशिर्वाद घेतले असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदार संघातील फलटण तालुक्यातील पवार साहेब व सुभाष भाऊ यांच्या सहकाऱ्यांना, सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, युवक-युवती, महिला तसेच महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्ष यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आदरणीय पवार साहेबांचे व सुभाषभाऊ यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत. आदरणीय पवार साहेब हेच आमचा पक्ष व उमेदवार असे मानुनच आम्ही काम करणार आहोत; असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!