फलटणच्या ओबीसी बांधवांच्या कायम सोबत राहणार : आमदार गोपीचंद पडळकर


दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | फलटण शहरासह फलटण तालुक्यामध्ये ओबीसी संघटना चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आगामी काळामध्ये कोणतीही अडीअडचण आली; तरी फलटणच्या ओबीसी बांधवांच्या कायम सोबत राहणार असून कधीही कसलीही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्याचा आवाहन ओबीसी नेते तथा विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.

फलटण येथील श्री संत सावता महाराज मंदिर येथे ओबीसी नेते तथा विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदिच्छा भेट देत ओबीसी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी आमदार पडळकर बोलत होते. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीचे विविध समन्वयक उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी फलटण येथे ओबीसी नेत्यांना दिलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विविध चर्चांना उधाण आले आहे. फलटण तालुक्यातील ओबीसी नेत्यांना नाव व गावानिशी आमदार गोपीचंद पडळकर ओळखत असल्याने आमदार पडळकर यांचा किती दांडगा संपर्क आहे; हे यातून स्पष्ट झाले.


Back to top button
Don`t copy text!