फलटण वनविभागाच्या वतीने श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय येथे वन्यजीव सप्ताह साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण वनविभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह दि. १ ते ७ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरा करण्यात आला.

सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेंद्र कुंभार, वनपरिक्षेत्र अधिकारी, फलटण विभाग, श्री. राहुल निकम, वनअधिकारी, फलटण, श्रीमती सारिका लवांडे, वनपाल, फलटण, श्री. सचिन जाधव, अध्यक्ष, ग्लोबल अर्थ फाऊंडेशन, श्री. सुधीर इंगळे, माजी प्राचार्य, मुधोजी महाविद्यालय, फलटण, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे श्री. राजेंद्र कुंभार यांनी वन्यजीव सप्ताहाची पार्श्वभूमी, भारतातील १९५२ सालापासून १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन, नामशेष होत चाललेल्या वन्य पशूपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे, हा त्यामागील हेतू आहे. आता या मूळ हेतूचा काळानुसार विस्तार झाला आहे. वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जात आहेत, अशा विविध वन्यजीव संबंधित विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री. राहुल निकम यांनी वन्यजीव सप्ताहात वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करणे, तसेच कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळच्या प्राणीमित्रांना अथवा वनविभागला (टोल फ्री संपर्क क्रमांक १९२६) संपर्क करण्याचे आवाहन उपस्थितांसमोर करण्यात आले.

श्री. सचिन जाधव यांनी नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याविषयी आस्था वाढत असून त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणाचे महत्त्व, या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. सुधीर इंगळे यांनी जागतिक वन्यजीव संवर्धनाकरिता भारताचे योगदान, वन्यजीव व भारतीय संस्कृती, वन्यजीव संरक्षणाकरिता लोकांचे कर्तव्य, या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी वन्यजीव व निसर्गाची ओळख, मानव-वन्यजीव सहअस्तित्व, वन्यजीवांच्या परस्परसंबंधांविषयी, निसर्गातल्या विविध घडामोडींमध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाविषयी माहिती तसेच वन विभागाचे वन्यप्राणी संरक्षणासाठी असणारे कर्तव्य व योगदान, या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली.

सदरील कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे, प्रा. महेश बिचुकले, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार प्रणव माने व आभार कुमारी प्रणिता आगवणे हिने व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!