
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
ठाकुरकी (ता. फलटण) येथे विवाहितेला दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ‘तू इथे नांदायचे नाही’ असे म्हणून तिच्यासह पतीला सासूसह इतर पाचजणांनी कोयता, लोखंडी फुकणी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद विवाहिता गुड्डी अंकुश चव्हाण (वय ३०, रा. ठाकुरकी ता. फलटण) हिने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
लक्ष्मी लालासो चव्हाण, लालासो गणपत चव्हाण, भाऊसो लालासो चव्हाण, संचिता अंकुश चव्हाण, लता अंकुश शिरतोडे (सर्व रा. ठाकुरकी, ता. फलटण) व बाबु लव्हा शिरतोडे (रा. धुमाऴवाडी, ता. फलटण) अशी आरोपींची नावे आहेत.
या घटनेचा अधिक तपास म.पो.हवा. राणी फाळके करत आहेत.
