स्थैर्य, सातारा, दि.२६: येथील बाँबे रेस्टारंट चौकातील रिक्षा स्टॉप येथे मित्राची भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकाला लोखंडी हत्याराने डोक्यात मारून जखमी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी रोहन माने, हसन शेख दोघे रा. वनवासवाडी, ता. सातारा यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, बाँबे रेस्टॉरंट चौकात फिर्यादी संजय गुलाबराव भिसे वय 40 यांचा मित्र किशोर राऊत याचे आरोपींसमवेत भांडण सुरू होते. ही भांडणे सोडवण्यास संजय भिसे त्याठिकाणी गेले. यावेळी आरोपींनी तु आमच्या भांडणात काय आला? तुझा काय सबंंध? असे म्हणून भिसे यांना कानफडात मारली. तसेच लोखंडी हत्याराने भिसे यांच्या डोक्यात मारून जखमी केले. याप्रकरणी रोहन माने व हसन शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार जाधव करत आहेत.