स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 8, 2021
in लेख
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.८: तुम्ही केव्हापासून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहात, हे फार महत्त्वाचे नाही तर एक प्रश्न महत्त्वाचा आहे की, मी शेअर कधी खरेदी अथवा विक्री केला पाहिजे? विशेषत: तुम्ही मार्केटमध्ये नवे असाल तेव्हा हा प्रश्न आणखी महत्त्वाचा ठरतो. योग्य ज्ञान घेतले तरच, तुम्हाला नफा होतोय की तोटा हे ओळखता येईल. आपण शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी कोणत्या प्रमुख गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबद्दल सांगताहेत फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रांजल कामरा.

खरेदी करण्याच्या उद्देशात बदल: एखाद्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी करत असताना त्यामागे कारण असणे आवश्यक आहे. उदा. एका प्रमुख बँकेचे शेअर्स खरेदी करणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात, कारण तिच्या सीईओंच्या अर्थविषयक कौशल्यावर तुमचा विश्वास आहे. एकदा का ते पदावरून दूर झाले की, गुंतवणुकीसाठी कारणच उरत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की, बँक अपयशी होईल किंवा तिच्या शेअर्सची किंमत घसरेल. तरीही तुमची गुंतवणूक एका विशिष्ट घटकावर अवलंबून होती, म्हणून तुम्ही ते शेअर्स विकणेच योग्य ठरेल. नेहमीच गुंतवणूक करताना कारणे पहा, कारण नष्ट झाल्यावर आपण त्या गुंतवणुकीतून बाहेर पडणेच योग्य ठरेल.

उद्योगातील क्रांती: एखादी कंपनी ज्या क्षेत्रात आहे तेथे नियामांमध्ये सुधारणा किंवा पूर्ण परिवर्तन असे रचनात्मक बदल होत असतात. उदा. काही वर्षांपूर्वी डीटीएच क्षेत्र बहरात होते. लोक सेट-टॉप-बॉक्स आणि डिश कनेक्शन खरेदीसाठी धाव घेत होते. अगदी सरकारनेही या गोष्टीला प्रोत्साहन दिले. पण अचानक ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रवेश झाला आणि त्यांनी ही बाजारपेठ खिशात टाकली. हा जणूकाही एका रात्रीतून झालेला बदल असावा. डीटीएच क्षेत्र जवळपास थांबल्यासारखेच झाले. याच कारणास्तव आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे, तेथील भविष्यातील तंत्रज्ञानावर लक्ष ठेवले पाहिजे. भूतकाळात हे क्षेत्र किती बहरात होते, याने फार फरक पडत नाही, आपण भविष्यवर लक्ष ठेवले पाहिजे आणि काही धोका दिसत असल्यास आपले स्थान तत्काळ बदलले पाहिजे.

मर्यादित भांडवल: तुम्ही कर्मचारी असाल अथवा अब्जाधीश असाल, प्रत्येकालाच भांडवलाची मर्यादा असते. तुम्ही तुमचे सर्व भांडवल एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले आणि एखादी उत्कृष्ट संधी तुम्हाला दिसली तर तुम्ही मागील शेअर्स विकले पाहिजेत आणि आणखी चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

मूलभूत तत्त्वे: हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. समजा, तुम्ही स्थिर कॅश फ्लो आणि कमी कर्ज असलेल्या कंपनीत शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र अलीकडेच कंपनी कर्जात बुडून वाईट प्रतिमा निर्माण करत असेल किंवा प्रमोटर्स तिच्यापासून दूर रहात असतील, शेअर्स गहाण ठेवले असतील इत्यादी. तेव्हा हे शेअर्स तत्काळ विकणे योग्य ठरते.

किंमत खूप वाढली असताना शेअर्स विकणेही योग्य नाही. तुम्हाला चांगला गुंतवणूकदार व्हायचंय किंवा शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करायची असेल तर तुम्ही किमान १० पटींनी परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. त्यामुळे शेअर्स विक्री करण्यापूर्वी, त्यांची किंमत चांगली असेल तेव्हा थोडा वेळ वाट पहा आणि कंपनीवर विश्वास असेल तर तिला आणखी एखादी संधी द्या.

शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट वेळ कोणती हे पाहुयात:

जास्त मागणी असलेले शेअर्स टाळा: ‘चुकीचे शेअर्स खरेदी करण्याची योग्य वेळ कोणतीच नसते’, हे शब्द नेहमीच लक्षात ठेवावेत. शेअर्स कधी खरेदी करावेत, यापेक्षा ते कधी खरेदी करू नयेत, हे जाणून घ्या. उदा. एखादा शेअर दररोज ५२ आठवड्यातील उच्चांक मोडत असल्याने माध्यमांत झळकत असेल, असंख्य लोक तो शेअर खरेदी करत असतील तरीही ही गर्दी कोसळणार आणि शेअरचे मूल्य नक्कीच कमी होईल. याचाच अर्थ या हाइपमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्ही भांडवलाचा एक भाग गमवाल. कदाचित तो स्टॉक लोअर स्टॉकवर जाईल तेव्हाही तुम्ही तो शेअर खरेदी करु शकणार नाहीत, अशीही शक्यता आहे. त्यामुळे प्रचंड लोकप्रिय झालेले व माध्यमांत झळकणारे शेअर्स टाळा. जर ते वाढले नाहीत किंवा उच्च स्तराला नाही पोहोचले किंवा स्थिर राहिले तरीही काही वेळाने का होईना, तुम्ही स्थिर होऊ शकाल.

भांडवल वाटप चक्र पूर्ण झाले: उदा. एखाद्या कंपनीची मागील पाच वर्षातील कामगिरी अत्यंत चांगली असेल, तिने जवळपास ५००० कोटींचा नफा जमवला असेल तर कंपनी ७५०० कोटी रुपये खर्च असलेला नवीन उत्पादन प्रकल्प उभारायचा निर्णय घेते. तरीही ती व्यवसायासाठी खुली नाही. कागदोपत्री ती कंपनीसारखी वाटत असली, प्रचंड नफ्यात असूनही आता २५०० रुपयांचे कर्ज असेल व आता त्यातून फार उत्पन्न मिळत नसेल तर तुम्ही कदाचित त्या कंपनीला नाकारू शकता. पण तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, नवीन प्रकल्पात प्रक्रिया सुरू होताच, तिची विक्री दुप्पट होईल. एकदा असे घडले की, शेअर्सच्या किंमतीही दुप्पट होतील.

उद्योगाची वृद्धी: आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक करतो, तेथे वृद्धीची शक्यता आहे की नाही, हेही तपासून पाहिले पाहिजे. आपण काही वर्षांपूर्वीचाही अभ्यास केला पाहिजे, हे क्षेत्र वाढत राहणार किंवा स्थिर राहिल, हे तपासले पाहिजे. उदा. स्वत:ला एक प्रश्न विचारा की, पाच वर्षांनंतर लोक लॅपटॉप वापरणार आहेत का? उत्तर होय असेल तर त्या उद्योगात गुंतवणूक करा. तर, आता शेअर्स कधी खरेदी करायचे आणि कधी विकायचे, याची मूलभूत तत्त्वे तुम्हाला कळाली. यात थोडी अभ्यासपूर्वक, वेळ देऊन पार्श्वभूमी अभ्यासावी लागते, त्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता.


ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. शशि डोईफोडेंनी आरोपीचा पुरवला पिच्छा

Next Post

रेशीम उद्योगासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

रेशीम उद्योगासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

पेट्रोल दरवाढीमुळे फलटण तालुक्यात चक्क पेट्रोल लाईनमधुन पेट्रोल चोरीचा प्रयत्न

March 2, 2021

राष्ट्रीय सुरक्षा दिन

March 2, 2021

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

March 2, 2021

मुंबईतील काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या भावाविरोधातील बलात्काराचा गुन्हा लोणावळा पोलिस ठाण्यात वर्ग

March 2, 2021

अभिनेत्री शिवानी सुर्वे हीने ‘मराठी फिल्म फेअर’ सोहळ्यात पटकावला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) पुरस्कार

March 2, 2021

विना मास्क विरोधी पथक आणि माजी आमदारांत हाणामारी; गुलमंडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

March 2, 2021

हरियाणा सरकारचा मोठा निर्णय! भूमिपुत्रांना खासगी नोकरीत ७५ टक्के आरक्षण जाहीर

March 2, 2021

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 10 ऐवजी द्यावे लागणार 50 रुपये

March 2, 2021

2020 मध्ये मुकेश अंबानींच्या संपत्तीत 24%, तर अडानींच्या संपत्तीत दुपटीने वाढ

March 2, 2021

एमजी इंडियाद्वारे नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर ऍम्बुलन्स दान

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.